Site icon सक्रिय न्यूज

परदेशातून आलेले आणखी सहाजण कोरोनाबाधित……!

परदेशातून आलेले आणखी सहाजण कोरोनाबाधित……!

मुंबई दि.5 –  राज्यातील कोरोना विषाणूच्या (Corona Virus) ओमिक्रॉन वेरिएंटचा (Omicron) संसर्ग झालेला पहिला रुग्ण डोंबिवलीत (Dombivli) आढळला आहे. संबंधित रुग्णाला काही त्रास नसल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे काळजी वाढवणारी बातमी समोर आली असून कल्याण डोंबिवलीत परदेशातून आलेले आणखी 6 जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

                    परदेशातून आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या 6 जणांपैकी 4 जण नायजेरियाहून आलेले, 1 जण रशिया, तर 1 जण नेपाळहून आलेला आहे. या 6 पैकी 5 जण डोंबिवलीत राहणारे, तर एक जण कल्याणचा आहे. सर्व जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनाही कल्याणच्या आर्ट गॅलरी कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यांचे नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून ओमिक्रॉंन आहे की नाही हे 7 दिवसात कळणार आहे.
शेअर करा
Exit mobile version