Site icon सक्रिय न्यूज

आणखी एक ”वॉन्टेड” केज पोलिसांनी घेतला ताब्यात……!

आणखी एक ”वॉन्टेड” केज पोलिसांनी घेतला ताब्यात……!
केज दि.6 – पोलीसांना वेगवेगळ्या गुन्ह्यातील अनेक वर्षां पासून हवा असलेला सराईत गुन्हेगार तायड्या उर्फ सुरेश शिवराम शिंदे याला केज  पोलिस स्टेशन प्रभारी शंकर वाघमोडे   आणि तपास पथक प्रमुख दादासाहेब सिद्धे यांच्या पथकाने सिताफिने सांगलीतुन ताब्यात घेत त्याला बेड्या ठोकल्या.
                 जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात दरोडा, घरफोडी, जबरी चोऱ्या आणि वाटमारी या सारखे गुन्हे दाखल असलेला फरार आरोपी केज तालुक्यातील पिंपळगाव येथील तायड्या उर्फ सुरेश शिवराम शिंदे  MPDA कायद्यांतर्गत ताब्यात घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी बीड यांनी पारित करताच केज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे यांच्यासह
पोलीस जमादार शिवाजी शिनगारे, अशोक नामदास, महिला पोलीस जमादार रुक्मिणी पाचपिंडे आणि  पो.स्टे DB पथकातील दिलीप गित्ते  यांचे पथक सायबर शाखा येथील psi नाचण यांच्याशी समन्वय साधून तायड्याच्या मार्गावर थेट सांगली येथे रवाना केले.
                 केज पोलीसांच्या पथकाला दि. ५ डिसेंबर रोजी रात्री 09.30 वाजेच्या सुमारास तालुका मिरज येथील मलगावच्या परिसरातून  एका उसाच्या फडात ऊसतोडीचे काम करीत असल्याची माहिती मिळाली. पोलीस पथकाला पहाताच तायड्या पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना पोलीस पथकाने त्याचा उसाच्या शेतात फिल्मी स्टाईलने पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. त्याला केज पोलीस ठाण्यात आणल्या नंतर त्याची रवानगी औरंगाबाद  येथील हर्सूल कारागृहात करण्यात आली आहे.
शेअर करा
Exit mobile version