बीड दि. 8 – तामिळनाडू मधील कुनूर येथे झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात देशाचे सिडीएस तथा माजी लष्कर प्रमुख बिपीन रावत यांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
एक कार्यक्रम आटोपून बिपीन रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी मधूलिका रावत व अन्य 12 उच्च दर्जाचे अधिकारी परत येत असताना हा अपघात झाला होता. सदरील घटना अतिशय दुर्दैवी असून उच्च स्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही तातडीची बैठक बोलावली आहे. सदरील अपघात नेमका कसा आणि का झाला याची चौकशी होईलच परंतु घडलेली घटना अतिशय धक्कादायक आहे.