केज दि.१० – जुन्या भांडणाची कुरापत काढून एका युवकास लाथाबुक्याने मारहाण करीत मांडीवर चाकू मारल्याची घटना केज तालुक्यातील आनंदगाव येथे घडली. याप्रकरणी एकाविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
केज तालुक्यातील जवळबन येथील अजय अनिल करपे ( वय १९ ) या युवकास ९ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास आनंदगाव येथे त्याच्या गावातील बाळासाहेब रामलिंग वावदाणे याने जुन्या भांडणाची कुरापत काढून लाथाबुक्याने मारहाण केली. अजय याला गचुंडी धरून खाली जमिनीवर पाडत बाळासाहेब याने खिशातील चाकू काढून त्यांच्या डाव्या पायाच्या मांडीवर मारून दुखापत केली. त्याने पुन्हा नादाला लागल्यास जीवे मारून टाकीन अशी धमकी ही दिली. अजय करपे याच्या फिर्यादीवरून बाळासाहेब वावदाणे याच्याविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. जमादार देवानंद कांबळे हे पुढील तपास करत आहेत.