Site icon सक्रिय न्यूज

३६ वर्षीय महिलेची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या……..! 

३६ वर्षीय महिलेची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या……..! 
 केज दि.११ – एका ३६ वर्षीय महिलेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना केज तालुक्यातील धोत्रा येथे घडली. सुमित्रा रामा ठोंबरे असे या मरण पावलेल्या महिलेचे नाव असून त्यांनी आत्महत्या का केली ? याचे कारण स्पष्ट झाले नाही.
       धोत्रा येथील सुमित्रा रामा ठोंबरे ( वय ३६ ) ही महिला १० डिसेंबर रोजी शेतात कामाला जाते असे सांगून शेतात गेली. तर तिचा मुलगा अंकुश रामा ठोंबरे हा शेळ्या चारण्यास गेला होता. तो सायंकाळी सहा वाजता शेळ्या घेऊन घरी आला असता त्याची आई सुमित्रा ह्या घरी आल्या नव्हत्या. त्यामुळे त्याने शेतात जाऊन पाहिले असता सुमित्रा ह्या बेशुद्ध पडल्या होत्या. त्यांना उपचारासाठी नांदूरघाट येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले.
         दरम्यान, सुमित्रा ठोंबरे यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले असून त्यांनी आत्महत्या का केली ? याचे कारण स्पष्ट झाले नाही. अंकुश ठोंबरे याच्या खबरेवरून केज पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून नांदूरघाट चौकीचे जमादार ए. एम. मेसे हे पुढील तपास करत आहेत.
शेअर करा
Exit mobile version