Site icon सक्रिय न्यूज

लातूरमध्ये आढळला ओमीक्रॉन चा पहिला रुग्ण…..!

लातूरमध्ये आढळला ओमीक्रॉन चा पहिला रुग्ण…..!

लातूर दि.१३ –  जिल्ह्यात ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण आढळला आहे. हा रुग्ण दुबईवरुन भारतात आला होता. या 35 वर्षीय रुग्णात लक्षणं आढळून आली होती. लातूर महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये या रुग्णावर उपचार सुरू असल्याची माहिती पुढे आली आहे. परदेशातुन आलेल्या 51 पैकी एका रुग्णाचा स्वॅब तपासणीसाठी पाठवला होता. त्याचा अहवाल आज आल्यानंतर तो रुग्ण ओमिक्रॉन पॉझिटिव्ह असल्याचं स्पष्ट झालं. दरम्यान या रुग्णाची प्रकृती चांगली असल्याची माहिती देण्यात येत आहे. हा रुग्ण औसा इथला रहिवासी आहे. नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

राज्यातील ओमिक्रॉनच्या एकूण रुग्णांची संख्या आता 20 वर पोहोचली आहे. दरम्यान, दिलासादायक बाब ही की ओमिक्रॉनच्या एकूण रुग्णांपैकी 9 जणांची आरटीपीसीआर चाचणी आता निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे. आतापर्यंत राज्यात ओमिक्रॉनचे मुंबईत 5, पिंपरी-चिंचवडमध्ये 10, पुणे महापालिका हद्दीत 2, कल्याण-डोंबिवलीत 1, नागपूरमध्ये 1 आणि लातूरमध्ये 1 रुग्ण आढळून आला आहे.

तर ब्रिटनमध्ये ओमिक्रॉन व्हायरंटचा पहिला मृत्यू झाला आहे. स्वत: ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ही माहिती दिली आहे. या स्ट्रेनमुळे शेकडो लोकांना रुग्णालयात दाखल कराव लागत आहे. 30 पेक्षा अधिक वयाच्या लोकांनी कोरोना व्हॅक्सीनचा बुस्टर डोस घ्यावा, असं आवाहन करतानाच ओमिक्रानकडे जराही दुर्लक्ष करू नका, असा सावधतेचा इशाराही बोरिस जॉन्सन यांनी दिला आहे.

शेअर करा
Exit mobile version