केज दि.१४ – तु आमच्या शेतातील विहीरीवरच्या पाण्याच्या मोटारी का जाळल्या म्हणत एकास काठी व बुटाने मारहाण करून हात फ्रॅक्चर केला व जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी केज पोलीसांत चौघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील साळेगाव येथे दि. १३ डिसेंबर रोजी सायंकाळी ६.२० च्या दरम्यान शालींदर सखाराम गिते यास
महादु सुखदेव गित्ते, बलभिम तुकाराम गित्ते, मिना श्रीराम गित्ते, पार्वती महादु गित्ते रा. साळेगाव ता. केज यांनी तू आमच्या विहिरीवरील मोटारी लाकडाचे टेकन देवुन का जाळल्या अशी कुरापत काढुन फिर्यादीचे डावे हाताचे मनगटावर काठी मारुन हात फँक्चर केला बुटाने पाठीत, डोक्यात मारुन मुक्कामार दिला. तसेच अन्य दोघांनी गळ्यावर नखाने ओरबडुन दुखापत करुन शिवीगाळ केली व जिवे मारण्याची धमकी दिली आहे.
शालींदर सखाराम गित्ते यांच्या फिर्यादीवरून वरील चौघां विरोधात केज पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोना श्री.गायकवाड हे करत आहेत. यांचेकडे देण्यात आले.