उस्मानाबाद दि.15 – शारजा, युएई (संयुक्त अरब अमिरात) हुन उस्मानाबाद जिल्ह्यात आलेला 42 वर्षीय रुग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आता त्या रुग्णाचा ओमीक्रॉन अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. उस्मानाबाद आरोग्य विभागाने 5 नमुने ओमीक्रॉन चाचणीसाठी पाठविले होते त्यापैकी 2 ओमीक्रॉन पॉझिटिव्ह आले आहेत. यात येथील तरुण व त्याच्या घरातील एकजण पॉझिटिव्ह आला आहे. बावी येथील या तरुणाच्या संपर्कातील आणखी काही रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत मात्र त्यांचे ओमीक्रॉन अहवाल येणे अद्याप बाकी आहे.
उस्मानाबाद तालुक्यातील बावी येथील परदेश दौरा करून आलेला व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आला. त्याच्या संपर्कातील 2 जण पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोनाचे निदान झाल्यावर त्यापूर्वी म्हणजे परदेश दौरा केल्यावर गावी आल्यावर हा व्यक्ती खुलेआम विनामास्क गावभर गाठीभेटी घेत फिरला. या व्यक्तीने संपूर्ण गावाचा जीव टांगणीवर आला आहे. त्यातच त्याचा ओमीक्रॉन अहवाल पॉझि आल्याने चिंतेत भर पडली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील बावी या गावात कोरोनाचे 3 रुग्ण सापडल्याने या गावाच्या सीमा बंद करून कलम 144 लागू करण्याचे आदेश उपविभागीय दंडाधिकारी डॉ. योगेश खरमाटे यांनी काढले आहेत.