Site icon सक्रिय न्यूज

पुढील 3 ते 4 दिवस थंडीची तीव्र लाट…….!

पुढील 3 ते 4 दिवस थंडीची तीव्र लाट…….!

मुंबई दि.17 –  हिवाळा सुरु असून सर्वत्र थंडीची (Cold) लाट दिसत आहे. थंडी सुरु होऊनही अनेक ठिकाणी पाऊस कोसळत आहे. वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे हवामान बदलल्याचं चित्र पहायला मिळत आहे. या बदलांमुळे अनेकांचं नुकसान झाल्याचं चित्र आहे. अशातच आता पुढील 3-4 दिवस थंडीची लाट (Cold Wave) येणार आहे.

पश्चिमी वाऱ्यांच्या प्रभावामुळे पंजाबसह वायव्य भारतात थंडीची लाट (Cold wave in India) आली आहे. त्यामुळे पुढील 3-4 दिवस तीव्र थंडीटी लाट येण्याची शक्यता असल्याचं हवामान खात्यानं वर्तवलं आहे. येत्या 4-5 दिवसांत वायव्य व लगतच्या मध्य भारत व गुजरात राज्याच्या बहुतेक भागांत किमान तापमानात 2-4 डिग्री घसरण व काही ठिकाणी थंडीची तीव्र थंडीची लाट शक्यता आहे, असं हवामान खात्याचे के. एस. होसळीकर यांनी सांगतिलं आहे.

दरम्यान, येत्या चार ते पाच दिवसात ठिकाणी किमान तापमानात 3 ते 4 अंश सेल्सिअस तापमानाची घट होणार आहे. याचा परिणाम राज्यातही जाणवणार आहे.

शेअर करा
Exit mobile version