केज दि.१९ – पोलिसात केसेस का केल्या असे कारण काढून एका महिलेस काठी व दगडाने मारहाण करीत डोके फोडल्याची घटना केज तालुक्यातील कळंमअंबा येथे रविवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी युसुफवडगाव पोलिसात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
कळंमअंबा येथील अस्मिता अनिल ओव्हाळ या महिलेस गावातील विठ्ठल उद्धव घाडगे, उद्धव देविदास घाडगे, इंद्रजित उद्धव घाडगे, कैकयी उद्धव घाडगे यांनी तू पोलिसात केसेस का केल्या असे कारण काढून काठी व दगडाने मारहाण करीत डोके फोडले. शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. अस्मिता ओव्हाळ यांच्या फिर्यादीवरून विठ्ठल घाडगे, उद्धव घाडगे, इंद्रजित घाडगे, कैकयी घाडगे या चौघांविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक फौजदार रामधन डोईफोडे हे पुढील तपास करत आहेत.