Site icon सक्रिय न्यूज

दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सरकारी नौकरीची संधी, अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 जानेवारी……!

दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सरकारी नौकरीची संधी, अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 जानेवारी……!

मुंबई दि. 22 – अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग इथे लवकरच जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. चालक आणि शिपाई.या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीन अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 जानेवारी 2022 असणार आहे.

                        या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शालेतून किंवा शैक्षणिक संस्थेतून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांकडे स्वतःचं ड्रायव्हिंग लायसन्स असणं आवश्यक. उमेवारांना चारचाकी वाहन चालवण्याचा अनुभव असणं आवश्यक आहे. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शालेतून किंवा शैक्षणिक संस्थेतून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना कोणत्याही ऑफिसमध्ये शिपाई म्हणून अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवार हे शारीरिकदृष्या सक्षम असणं आवश्यक आहे. उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार आणि अनुभवानुसार पगार दिला जाणार आहे. चालक या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचं वय 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक आहे. शिपाई (Peon) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचं वय 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक आहे. दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो आवश्यक आहे.
            आस्थापना शाखा, इमारत क्रमांक- 219, दुसरा मजला, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, डॉ. मॅडम कामा रोड, मंत्रालय, मुंबई-400032 या पत्त्यावर अर्ज करू शकतात. सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी http://www.mahafood.gov.in/website/marathi/home.aspx या लिंकला भेट द्या.
शेअर करा
Exit mobile version