Site icon सक्रिय न्यूज

तूर खरेदी केंद्रावर घेऊन जावी – नंदकिशोर मुंदडा

केज दि.८ – सर्व शेतकऱ्यांना तुरीचे मेसेज गूगल ऑनलाईन केले होते.मात्र कांही तांत्रिक अडचणीमुळे सर्व शेतकऱ्यांना ते मिळाले नाहीत. त्यामुळे उद्या (मंगळवार) पासून तूर खरेदी सुरू होत आहे. तरी शेतकऱ्यांनी दि.१३ जून पर्यंत आपापली तूर धारूर खरेदी केंद्रावर घेऊन जाण्याचे आवाहन जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा यांनी केले आहे.
        धारूर खरेदी केंद्रावर केज धारूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी तूर ऑनलाईन केली होती. त्यानुसार सर्व शेतकऱ्यांना तुरीचे मेसेज ऑनलाईन पाठवले होते. मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे सर्व शेतकऱ्याना ते मिळू शकले नाहीत. अश्या शेतकऱ्यांनी दि.१३ जून पर्यंत आपली तूर खरेदी केंद्रावर घेऊन यावी.
         तसेच मंगळवार पासून धारूर खरेदी केंद्रावर हरबरा खरेदी सुरू होणार आहे. परंतु एकच चाळणी असल्यामुळे रोज फक्त १० शेतकऱ्यांची खरेदी होईल. मात्र उद्या नवीन चाळणी आणखी फिटिंग होणार असल्याने परवा पासून १०० शेतकऱ्यांचा हरबरा खरेदी होईल. दरम्यान ७००० शेतकऱ्यांनी हरभऱ्याची नोंद केलेली आहे. अश्या परिस्थितीत हरबरा खरेदीस दोन महिने लागतील. परंतु पावसाचे वातावरण व थोडा पाऊस झाल्यामुळे हरभऱ्यास भुंगा लागून, पीठ होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे तूर व हरभरा शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर घेऊन जाण्याचे आवाहन नंदकिशोर मुंदडा यांनी केले आहे.
शेअर करा
Exit mobile version