Site icon सक्रिय न्यूज

कळंब तालुक्यात आढळले ओमीक्रॉन चे रुग्ण……!

कळंब तालुक्यात आढळले ओमीक्रॉन चे रुग्ण……!
कळंब दि.23 – दिवसेंदिवस ओमायक्रॉन चे रुग्ण वाढू लागले आहेत.मागच्या कांही दिवसांत लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात रुग्ण आढळून आले होते. त्यातच पुन्हा कळंब तालुक्यातील मोहा येथे घाना देशातून आलेल्या बाप-लेकास ओमायक्रॉनची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील रूग्णांची संख्या आता पाच झाली आहे.
                    कळंब तालुक्यातील मोहा येथील एक कुटूंब घाना देशात स्थायिक होते. जगातील इतर देशांसोबतच घाना येथेही ओमायक्रॉन चा धोका वाढल्याने सदर कुटूंब चार-पाच दिवसांपूर्वी हायरिस्क असलेल्या घाना देशातून विमानाने थेट दिल्लीत आले होते. त्यावेळी सर्वांची टेस्ट केली असता, रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. यानंतर हे कुटुंब मोहा येथे दाखल झाले. राज्यस्तरीय कार्यालयाकडून संबंधित कुटुंबाची  माहिती आरोग्य विभागाला दिल्यानंतर त्यांची आरटीपीसीआर करण्यात आली.त्यात बाप-लेकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे या दोघांनाही जिल्हा रूग्णालयात भरती करून उपचार सुरू केले होते. तसेच ओमायक्रॉनच्या चाचणीसाठी सॅम्पल पुणे येथे पाठविले होते. हा अहवाल गुरूवारी आरोग्य विभागाला प्राप्त झाला. त्यानुसार बाप-लेकास ओमायक्रॉनची लागण झाल्याचे समोर आले आहे. यापूर्वी उस्मानाबाद तालुक्यातील बावी येथे तीन रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील ओमीक्रॉन रुग्णांची संख्या पाचवर पोहोचली आहे.
             दरम्यान उस्मानाबाद जिल्ह्यात ओमीक्रॉन चे रुग्ण आढळल्याने शेजारील जिल्ह्याची चिंता वाढली असून खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे मध्यप्रदेश मध्ये नाईट कर्फ्यु लागू करण्यात आला असून महाराष्ट्र सरकारही कठोर पावले उचलण्याच्या तयारीत आहे. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्कफोर्स ची बैठक बोलावण्यात आली असून यामध्ये काय निर्णय होतो याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
शेअर करा
Exit mobile version