केज दि.25 – कांही बालकांमध्ये जन्मत: काही आजार असतात. आणि त्या आजारावर उपचार करण्यासाठी ग्रामीण भागातील सर्वसामान्य पालकांना दूरवर शहरात जाऊन मोठ्या प्रमाणावर आर्थिक झळ सोसावी लागते. मात्र लहान बालकांच्या हृदयाच्या आजारावर तज्ञ असलेले आणि मराठवाड्यातील दुसरे बाल हृदयरोग तज्ञ डॉक्टर नितीन येळीकर हे केज शहरातील योगिता बाल रुग्णालय येथे भेट देणार असून ज्या बालकांना हृदय विकार आहेत अशा बालकांची तपासणी करणार आहेत.
डॉक्टर नितीन येळीकर हे केज शहरातील योगिता बाल रुग्णालय या ठिकाणी उद्या दिनांक 26 रोजी दुपारी एक वाजता भेट देणार असून ज्या बालकांना हृदय विकार आहे, हृदयामध्ये छिद्र आहे किंवा काही झडपांची समस्या आहे अशा बालकांची तपासणी करून पुढील उपचारासाठी मार्गदर्शन करणार आहेत.तसेच डॉक्टर नितीन येळीकर हे दर महिन्याच्या चौथ्या रविवारी योगिता बाल रुग्णालयात भेट देणार असल्याने परिसरातील बाल रुग्णांची मोठी सोय झालेली आहे तरी ज्या बालकांना हृदयासंबंधी विकार आहे त्या पालकांनी आपल्या पाल्यांची तपासणी करून घेण्याचे आवाहन बालरोगतज्ज्ञ डॉ.दिनकर राऊत व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.हेमा राऊत यांनी केले आहे.