नवी दिल्ली दि.25 – आयकर विभागाने उत्तर प्रदेशात तीव्र कारवाईस सुरुवात केली आहे. विधानसभा निवडणुका तोंडावर आल्याने आयकर विभागाने कारवाईंना वेग दिला आहे. आयकर विभागाने शिखर पान मसाल्याचे मालक पियुष जैन यांच्या घरात छापा टाकला होता. यावेळी या छापेमारीत आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना एवढ्या नोटा सापडल्या, की त्या मोजण्यासाठी 4 मशिन मागवाव्या लागल्या आहेत.
पियुष जैन हे शिखर पान मसाला या कंपनीचे मालक आहेत. शिवाय कानपूरमधील कन्नौज येथे त्यांच्या परफ्युमचा देखील बिजनेस आहे. आयकर विभागाने एक दिवस आधी शिखर पान मसाल्याशी संबधित सर्व ठिकाणी छापा मारला होता. त्यानंतर जैन यांच्या कानपुर येथील घरावर छापा टाकण्यात आला होता. या कारवाईत पोलिसांना जवळपास 150 कोटी रुपये सापडले आहेत.पियुष जैन यांच्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्कम सापडल्याने आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना ती मोजणं शक्य नव्हतं. शेवटी अधिकाऱ्यांना नोटा मोजण्याची मशिन मागवून या नोटा मोजाव्या लागल्या. त्यामुळे सध्या या छाप्याची संपूर्ण उत्तरप्रदेशमध्ये चर्चा रगंली आहे. नोटा मोजून झाल्यानंतर पियुष जैन यांच्या घराभोवती पोलिस सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
दरम्यान, पियुष जैन यांची शिखर पान मसाला बनवाणारी कंपनी आहे. याव्यतिरीक्त त्यांचे इतरही व्यवसाय आहेत. आयकर विभागाने आधी शिखर पान मसाल्याशी संबंधित सर्व ठिकाणी छापा घातला होता. त्यानंतर थेट पियुष जैन यांच्या कानपूर येथील आनंदपुरी या त्यांच्या घरावर छापा टाकला होता. या छाप्यात आयकर विभागाने 150 कोटी रक्कम जप्त केली आहे.