केज दि.२५ – राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आदेशाने विद्युत कामगार सहकारी पतपेढीची बैठक दि.14 डिसेंबर रोजी केज येथील सहाय्यक निबंधक सहकारी संस्था येथे संपन्न झाली
केज तालुक्यातील विद्युत कामगार सहकारी पतपेढी च्या अध्यक्ष ,उपाध्यक्ष ,मानद सचिव खजिनदार या पदांच्या निवडीसाठी आर.एम. मोटे प्राधिकृत अधिकारी तथा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था केज यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. बैठकीत निवडणूक कार्यक्रम जाहीर करून विहित वेळेत नामनिर्देशनपत्र भरणे, छाननी करून अंतिम उमेदवारांची यादी प्रसिध्द करून निवडणूक प्रक्रिया घेऊन मतमोजणी झाल्यानंतर निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली. त्यामधे अध्यक्षपदासाठी शिवाजी ज्ञानोबा घुले यांनी अर्ज दाखल केला होता. त्यांची विद्युत कामगार सहकारी पतपेढीच्या केज तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
या सर्व प्रक्रियेदरम्यान कल्याण मस्के यांचे मार्गदर्शन शिवाजी घुले यांना लाभले. सचिवपदी विष्णू तेलंग व व्हाइस चेअरमनपदी घुगे विष्णू ज्ञानोबा यांची बिनविरोध निवड झाली. त्यांच्या निवडीबद्दल मित्रपरिवारसह सर्व क्षेत्रातून आनंद व्यक्त केला जात आहे.