Site icon सक्रिय न्यूज

शेतातून बैलगाडी नेण्याच्या कारणावरून डोक्यात कुऱ्हाड घातली…..!

शेतातून बैलगाडी नेण्याच्या कारणावरून डोक्यात कुऱ्हाड घातली…..!

 

केज दि.२६ – आमच्या शेतातून तू बैलगाडी का नेतोस म्हणून केज तालुक्यातील कोठी येथे डोक्यात कुऱ्हाड मारून जखमी केल्या प्रकरणी चौघा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केज तालुक्यातील कोठी येथे दि.२१ डिसेंबर रोजी दुपारी २:०० वा. नवनाथ नरसु तपसे हे त्यांच्या शेतातील सोयाबीनचे खळे केल्या नंतर त्यांचा मुलगा हा माल बैलगाडीने घरी घेऊन जात असताना सुभाष सिताराम डोंगरे, नामदेव सुभाष डोंगरे, ज्ञानेश्वर सुभाष डोंगरे व मिराबाई सुभाष डोंगरे सर्व रा. कोठी ता. केज यांनी संगनमत करून सोयाबीन पोते भरलेली बैलगाडी अडविली; म्हणून नवनाथ तपसे यांनी त्यांना तुम्ही बैलगाड़ी का थांबवली? असे विचारले असता सुभाष सिताराम डोंगरे म्हणाला की, हे शेत माझे आहे. तू येथून बैलगाडी घेवून जायचे नाही. असे म्हणून शिवीगाळ केली आणि नामदेव सुभाष डोंगरे याने त्याचे हातातील कुऱ्हाड डोक्यात मारून डोके फोडून जखमी केले. तर  ज्ञानेश्वर सुभाष डोंगरे याने हातावर काठी मारून मुक्कामार दिला व मिराबाई सुभाष डोंगरे हिने शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली.

भांडण झाल्या नंतर जखमी नवनाथ तपसे यांनी दवाखान्यातून उपचार घेऊन घरी आल्या नंतर दि. २५ डिसेंबर रोजी केज पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. नवनाथ तपसे यांच्या तक्रारी नुसार सुभाष सिताराम डोंगरे, नामदेव सुभाष डोंगरे, ज्ञानेश्वर सुभाष डोंगरे हे तिघे भाऊ आणि मिराबाई सुभाष डोंगरे सर्व रा. कोठी ता केज या चौघांच्या विरुद्ध गु.र.नं. ५९७/२०२१ भा.दं.वि. ३२४, ५०४, ५०६ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बाळराजे सोनवणे हे करीत आहेत

शेअर करा
Exit mobile version