Site icon सक्रिय न्यूज

कत्तलखान्यावर पोलिसांचा छापा, 19 लाख 49 हजारांचा मुद्देमाल जप्त……!

कत्तलखान्यावर पोलिसांचा छापा, 19 लाख 49 हजारांचा मुद्देमाल जप्त……!
आष्टी दि.२७ – (सुरेश कांबळे) तालुक्‍यातील दौलावडगाव परिसरामध्ये असलेल्या कत्तलखान्यावर गोवंश प्राण्यांची कत्तल केली जात असल्याची माहिती पोलिस उपविभागीय अधिकारी अभिजीत धाराशिवकर यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोसावी यांनी इतर सहकाऱ्यांच्या मदतीने कत्तलखान्यावर पंचांसमक्ष छापा मारला.सदरील कारवाईत चार वाहने, कत्तलखान्यातील साहित्य, गोमांस असा एकूण 19 लाख 49 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
                   यामध्ये कत्तलखाना चालक खलील हारुन शेख (रा. दौला वडगाव तालुका आष्टी जि,बीड) जावेद अहमद कासम कुरेशी (रा. कुट गंज बाजार अहमदनगर) यांच्यासह अन्य साथीदारांवर आंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  आष्टी तालुक्यातील दौलावडगाव परिसरामध्ये मागील अनेक दिवसांपासून कत्तलखाना सुरू असल्याची व त्यामध्ये गोवंश प्राण्यांची कत्तल केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. छापा मारल्यानंतर कत्तलखान्यातील कामगार पोलिसांना पाहून पळून गेले मात्र घटनास्थळी (टेम्पो एम एच 10 झेड40 83 )दुसरा टेम्पो एम एच तेवीस डब्ल्यू 39 83) टेम्पो एम एच 03-सिपी 64 99  , एम एच16-ऐई,5404  या वाहनांमध्ये कत्तलीसाठी बांधून ठेवलेले गोवंशीय प्राणी आढळून आले.  एकूण 19 लाख 49 हजार पन्नास हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पशुवैद्यकीय अधिकारी यांना गोवंशीय जातीचे मांस नमुना तपासणी कामी काढून दिले असून सदरील वाहने अंभोरा  पोलिस ठाण्यात जमा करण्यात आली आहेत. तर जप्त केलेले गोमास घटनास्थळापासून काही अंतरावरच ते नष्ट करण्यात आले.
                 सदरील कारवाई पोलिस अधीक्षक आर राजा, अप्पर पोलिस अधीक्षक सुनील लांजेवार, विभागीय पोलिस अधिकारी अभिजीत धाराशिवकर यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोसावी,  सहाय्यक पोलीस निरीक्षक धुकरट, अंभोरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित बेंबरे, पोलीस उपनिरीक्षक देशमाने, पोना राठोड , पोलीस हवालदार तांदळे, पोलीस हवालदार ठेगल, मिसाळ, पोलीस नाईक का सकुंडे, वायबसे, पोलीस नाईक एकशिंगे, पोलीस नाईक देवडे,  पोलीस नाईक खंडागळे, पीसी केदार यांनी केली. पुढील तपास पीएसआय देशमाने करीत आहेत.
शेअर करा
Exit mobile version