Site icon सक्रिय न्यूज

पदवीधर, बारावी आणि दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नौकारीची संधी…….!

पदवीधर, बारावी आणि दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नौकारीची संधी…….!

 बीड दि.२९ – सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी. कर्मचारी राज्य विमा निगम (ESIC) ने अधिसूचना जारी करून विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत. महामंडळाने ज्या पदांसाठी अर्ज मागवले आहेत, त्यात अप्पर डिव्हिजन क्लर्क (UDC), लघुलेखक (स्टेनो.) आणि मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) या पदांचा समावेश आहे. या भरती प्रक्रियेद्वारे, ESIC देशभरात 3000 हून अधिक पदांची भरती करेल. इच्छुक आणि पात्र उमेदवार 15 जानेवारीपासून ESIC (Employee State Insurance Corporation) च्या www.esic.nic.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेद्वारे 3847 पदांवर भरती होणार आहे. उमेदवारांची निवड ऑनलाइन लेखी परीक्षेच्या आधारे केली जाईल. परीक्षेची तारीख आणि वेळ सध्या जाहीर केलेली नाही.

अर्ज प्रक्रिया 15 जानेवारी 2022 ते 15 फरवरी 2022 असणार आहे.UDC  पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन केलेले उमेदवार अर्ज करू शकतात. तर स्‍टेनोग्राफर साठी 12वी पास उमेदवार अर्ज करू शकतात. शिवाय त्यांना टायपिंग माहित असायला हवे.तसेच MTS पदासाठी दहावी पास उमेदवार अर्ज करु शकतात. UDC आणि स्‍टेनो पदासाठी 18 ते 27 वयोगटातील इच्छुक उमेदवार अर्ज करु शकतात. तर MTS साठी 18 ते 25 वयोगटातील इच्छुक उमेदवार अर्ज करु शकतात.

दरम्यान, अर्ज भरण्यासाठी सर्व प्रथम अधिकृत वेबसाइटला भेट देऊन नोंदणी करा. त्यानंतर अर्ज भरा आणि सेव्ह करा. तुमचा फॉर्म सत्यापित करण्यास विसरू नका आणि नंतर Save & Next बटण दाबा नंतर परीक्षा शुल्क भरा आणि डॉक्युमेंट स्कॅन करून अपलोड करा.

शेअर करा
Exit mobile version