केज – राज्यातील जनतेच्या आरोग्यासाठी शासनाचा महत्त्वाचा निर्णय घेतला असून राज्यांत वाढत असलेल्या कोरोना आजाराच्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्र शासन व केंद्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना प्रभावीपणे राबवून जनतेला चांगली व ऊच्च दर्जाची आरोग्य सेवा खाजगी रुग्णालयातून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्या नुसार पुर्वीचे ९११ व आणखीन ६७ आजारांवर या योजने अंतर्गत मोफत ऊपचार व शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. लातुर जिल्ह्यातील १२ खाजगी रुग्णालय व ७ शासकीय रुग्णालयांचा यांत समावेश प्रशासनाने केला आहे.
लातुर मधील नामांकित रुग्णालयामध्ये गायत्री हाॅसपीटलचा समावेश असुन या रुग्णालयात श्वसन विकार, दमा, ह्दयरोग, पॅरालिसीस, न्यमोनिया, डेंग्यू, स्वाईन फ्लु, फुप्फुसावरील विविध शस्त्रक्रिया, मुतखडा, स्त्रियांच्या गर्भाशयाचे ॲापरेशन, अँपेंडिक्स, विषबाधा, सर्पदंश, हर्निया, हायड्राेसिल, पोटाचे विकार ईत्यादी आजारांवर गायत्री हाॅसपीटल येथे ऊच्च दर्जाची सुविधा मोफत मिळणार आहे. काही ॲापरेशनची सुविधा ३१ जुलै पर्यंतच असुन ईतर आजारांवर वर्षभर मोफत ऊपचार मिळणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठल्याही उत्पन्नाची अट नसुन सर्व प्रकारच्या रेशन कार्डवर ह्या योजनेचा लाभ घेता येतो. तरी या योजनेचा बीड जिल्ह्यातील रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन गायत्री हाॅसपीटलचे संचालक व प्रसिद्ध श्वसनविकार तज्ञ डाॅ. रमेश भराटे यांनी केले आहे. विशेष म्हणजे श्वसन विकारतज्ज्ञ डॉ रमेश भराटे हे बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील आहेत. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी नांव नोंदणीसाठी खालील पत्त्यावर संपर्क करावा अशी माहिती डॉ. रमेश भराटे यांनी दिली आहे.
पत्ता-गायत्री हाॅसपीटल ॲंड क्रिटीकल केअर सेंटर ,बार्शी रोड,नवीन जिल्हाधिकारी कार्यालय समोर -लातुर
फोन-02382-224101