मुंबई दि.2 – देशात पुन्हा एकदा कोरोना (Corona) रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. राज्यातही तिचं परिस्थिती आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने (State Government) कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. याच दरम्यान राज्याचे आरोग्य सचिव डॉ. प्रदिप व्यास यांनी सर्व विभागीय आयुक्तांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात कोरोना रुग्णांच्या संख्येबाबत अंदाज व्यक्त केला आहे.
व्यास यांनी कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची भीती व्यक्त केली आहे. कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. ही वाढ अशीच सुरु राहिली तर जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात कोरोना बाधितांची संख्या 2 लाखावर जाण्याची शक्यता आहे, असं व्यास यांनी पत्रात म्हटलं आहे.ही रुग्णसंख्या वाढत राहिली तर आणि 80 लाखांवर गेली तर मृत्यू दर एक टक्का याप्रमाणे हजार मृत्यू होऊ शकतात. तसेच ओमिक्रॉनची लक्षणे सौम्य आहेत असं समजू नका. ज्यांनी कोविड प्रतिबंधात्मक लस घेतली नाहिये आणि सहव्याधी असलेल्या नागरिकांसाठी ओमिक्रॉन घातक आहे, असा इशाराही व्यास यांनी पत्रातून दिला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालच नागरिकांना सतर्क राहण्याबद्दल सांगितलं आहे. नववर्षांच्या शुभेच्छा देतानाच त्यांनी आपल्याला कोरोनाला हरवायचं आहे, असं आवाहनही केलं आहे. त्यामुळे आता राज्यात पुन्हा एकदा कोरोना विषाणूची भीती निर्माण झाली आहे.