Site icon सक्रिय न्यूज

साळेगाव परिसरात आढळलेल्या ”त्या” प्राण्याची ओळख पटली……!

साळेगाव परिसरात आढळलेल्या ”त्या” प्राण्याची ओळख पटली……!
केज दि.2 – तालुक्यातील साळेगाव परिसरात एका बिबट्या सारखा दिसणारा प्राणी प्रवाशांच्या दृष्टीस पडल्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तट संदर्भात  वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली असता सदर प्राणी हा बिबट्या नसून ते तरस असल्याचे त्यांनी सांगितले.
                दि. १ जानेवारी २०२२ रोजी सायंकाळी सातच्या दरम्यान नांदूर येथील ढाकणे हे मांगवडगाव कडे जात असताना त्यांना साळेगाव येथील साळेगाव ते चिंचोली माळी रस्त्यावरील दस्तगीरचा माळ नावाने ओळखल्या जात असलेल्या शेतातून जाणाऱ्या रस्त्यावर एक बिबट्या सारखा प्राणी आढळून आला. हा प्राणी नंतर त्यांना पाहून युवराज बुदगुडे यांच्या उसाच्या शेतात काटेरी तारांच्या कुंपणातून आत गेला. ही माहिती ढाकणे यांनी गावातील सरपंच कैलास जाधव व उपसरपंच अमर मुळे यांना दिली. त्या नंतर गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला होता. दि. २ जानेवारी रोजी सकाळी ९ वा. धारूर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी वन परिक्षेत्राधिकारी यु. एच. चिकटे, वन परिमंडळ धारूरचे एस. जी. वरवडे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक साळेगाव येथे आले. या पथकात वनरक्षक श्रीमती सारिका मोराळे, वनरक्षक संभाजी पारवे, वचिष्ठ भालेराव आणि चालक शाम गायसमुद्रे हे होते. त्यांच्या सोबत सरपंच कैलास जाधव पाटील उपसरपंच अमर मुळे आणि गावकऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता; शेतात आढळलेल्या पावलाच्या ठशा वरून ते ठसे हे बिबट्याचे नव्हे तर तरसाचे असल्याचा अंदाज वन अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे.
          दरम्यान, तरसा पासून मानव आणि पाळीव प्राण्यांना धोका नसून तरस हे कुत्र्यावर हल्ला करून त्यांना भक्ष्य करीत असतो अशी माहिती त्यांनी दिली.मात्र बिबट्याच्या भितीमुळे गावात व शेतवस्तीवर राहणाऱ्या नागरीकांत भिती निर्माण झाली होते.
शेअर करा
Exit mobile version