Site icon सक्रिय न्यूज

अखेर 1 ली ते 8 वीच्या शाळा बंद, मुंबई महापालिकेने घेतला निर्णय……!

अखेर 1 ली ते 8 वीच्या शाळा बंद, मुंबई महापालिकेने घेतला निर्णय……!

मुंबई दि.3 – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे. यातच कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्राॅननं (Omicron) थैमान घातलं आहे. त्यामुळे शाळा, महाविद्यालये सुरु करुनही आता भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. अशातच मुंबईतील शाळांविषयी महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

ओमिक्राॅनचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईमध्ये कोरोना आणि ओमिक्रॉनची रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे मुंबईमधील सर्व शाळा (School) पुन्हा एकदा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 4 जानेवारी ते 31 जानेवारीपर्यंत मुंबईतील 1 ली ते 8 वी पर्यंतच्या शाळा बंद करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे आता 10 ती 12 वीचे वर्ग वगळता 1 ते 8 वीच्या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने जगभरातील देशांची चिंता वाढवली आहे. Omicron व्हेरिएंट घातक नसला तरी त्याचा वेग डेल्टा व्हेरिएंटच्या (Delta Varient) तिप्पट आहे त्यामुळे सध्या ओमिक्रॉनची दहशत पाहायला मिळत आहे.

शेअर करा
Exit mobile version