बीड दि.4 – एएसपी पंकज कुमावत रुजू झाल्यापासून कारवायांचा धडाका सुरू आहे.जिल्ह्यातच नव्हे तर बाहेर जिल्ह्यात जाऊनही त्यांनी कित्येक गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत.आणि अशीच एक कारवाई बीड शहरातील मध्यवर्ती भागात घुसून क्याने गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.
अधिक माहिती अशी की, दिनांक 3/01/2022रोजी पोलीस अधीक्षक बीड यांना माहिती मिळाली की हिरालाल चौक बीड येथील राणा चव्हाण आपले घरासमोरील पत्र्याचे शेड चे बाजूला लाईटचे उजेडात काही इसमांना एकत्र जमून झन्ना मन्ना, अंदर बहार पत्त्याच्या जुगारावर पैसे लावून खेळ खेळवित आहे. त्यानुसार सदर माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना दिली असता पंकज कुमावत यांनी पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे केज येथील सपोनि संतोष मिसळे व उपविभागीय कार्यालयाचे कर्मचारी पाठवून सदर ठिकाणी रात्री 10 वाजता छापा मारला. सदर ठिकाणी जन्ना मन्ना जुगार खेळणारे सात इसम जागीच मिळून आले व एक इसम पळून गेला. दरम्यान, त्यांच्याकडून नगदी 93 830 रुपये व मोबाईल, मोटरसायकल असा एकूण 147830 रुपये चा माल जप्त करून एकूण 9 आरोपी विरुद्ध पोलीस हेडकॉन्स्टेबल बालाजी दराडे यांच्या फिर्याद वरून गुन्हा दाखल केला आहे. सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संतोष मिसळे, पोहेकॉ बालाजी दराडे, पोना रामहरी भडाने, राजू वंजारे, संतोष अहंकारे, बडे, जावळे, टूले यांनी केली.