Site icon सक्रिय न्यूज

आणखी एका जिल्ह्यातील शाळा बंद, ऑनलाइन शिक्षण सुरू राहणार……!

आणखी एका जिल्ह्यातील शाळा बंद, ऑनलाइन शिक्षण सुरू राहणार……!

बीड दि.4 – मुंबई, ठाणे, नवी मुंबई पाठोपाठ आता पुण्यातील शाळा बंद (School Closed) करण्याचा निर्णय आज घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत आज कोरोनास्थितीचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी वरील निर्णय जाहीर केलाय. या निर्णयानुसार पुणे शहर आणि जिल्ह्यातील 1ली ते 8वी पर्यंतच्या शाळा बंद राहणार आहेत. या वर्गांचे ऑनलाईन क्लास सुरु राहतील. तर 9वी आणि 10वीचे वर्ग हे ऑफलाईन पद्धतीनेच सुरु राहतील असं अजित पवार यांनी जाहीर केलं आहे.

कोरोनाची स्थिती बिकट होत आहे. पुणे जिल्ह्यात 74 टक्के लोकाचं लसीकरण झालं आहे. राहिलेल्या नागरिकांनी लवकर लस घ्यावी. लोकांना विनंती आहे की कठोर निर्णय लागू करण्यास भाग पाडू नका, असं आवाहन अजित पवार यांनी नागरिकांना केलंय. तसंच पुणे शहरात पॉझिटिव्हिटी रेट 18 टक्के झाला आहे. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे. पुणे शहरात 3 हजार 950 सक्रीय रुग्ण आहेत. 15 ते 18 वयोगटातील मुलांचं 4 टक्के लसीकरण झालं आहे. पालक आणि विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे, असं अजित पवार यांनी सांगितलं.

दरम्यान, वेगवेगळ्या डिझाईनचे कापडी किंवा 2 प्लायचे सर्जिकल मास्क वापरू नका. N95 किंवा 3 प्लाय असलेल्या मास्कचाच वापर करा. पुण्यात उद्यापासून मास्क नसेल तर 500 रुपये दंड आकारला जाणार आहे. तर मास्क नसताना थुंकल्यावर 1 हजार रुपये दंड आकारला जाईल. त्याचबरोबर उद्यापासून पुणे जिल्ह्यात सर्वत्र मॉल, खासगी तसंच सरकारी कार्यालयात कोरोना लसीचे दोन्ही डोस झाले नसतील तर प्रवेश मिळणार नाही. नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस खात्याला सक्त सूचना दिल्याचं अजित पवार यांनी सांगितलं.

राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची (Corona Patient) संख्या झपाट्याने वाढतेय. मुंबई, पुणे, नागपूर अशा शहरांमधील कोरोना रुग्यसंख्येत मोठी वाढ होत आहे. अशावेळी आज राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा तब्बल 18 हजाराच्या पुढे गेलाय. तर साडे चार हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजच्या कोरोना आकडेवारीमुळे राज्यातील कोरोना स्थिती (Corona Situation) आता चिंताजनक बणल्याचं पाहायला मिळत आहे.

 

शेअर करा
Exit mobile version