Site icon सक्रिय न्यूज

केज जवळ अपघात, अप्पे रिक्षातील एक महिला जागीच ठार तर दोघे जखमी…..!

केज जवळ अपघात, अप्पे रिक्षातील एक महिला जागीच ठार तर दोघे जखमी…..!
केज दि.५ – केज – अंबाजोगाई रोडवरील सोनी जवळा फाट्यानजीक  अप्पे रिक्षाचा अपघात दि.5 रोजी सकाळी 6 च्या दरम्यान झाला असून एकाचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
          अप्पे रिक्षात (MH 44 – 3182) दोन महिला व एक पुरुष असे तिघे असल्याचे व ते अंबाजोगाई तालुक्यातील डोंगर पिंपळा येथील असल्याचे सांगितले जात आहे.तिघांपैकी एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून अन्य एक महिला (अनिता पवार) व एक पुरुष गंभीर जखमी झाले आहेत. सदरील अपघात नेमका कसा झाला ? रिक्षाला कुठल्या अन्य वाहनाने उडवले का ? हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
          दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच डॉ.सचिन सूर्यवंशी व 108 चे पायलट मकरंद घुले यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी घेऊन आले असून पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
शेअर करा
Exit mobile version