Site icon सक्रिय न्यूज

येत्या चार दिवसांत ”या” भागात पावसाची शक्यता, तर कांही जिल्ह्यांना येलो अलर्ट……!

येत्या चार दिवसांत ”या” भागात पावसाची शक्यता, तर कांही जिल्ह्यांना येलो अलर्ट……!

मुंबई दि.५ – भारतीय हवामान विभागाच्यावतीनं राज्यात ऐन थंडीच्या दिवसात पुढील चार दिवसात विविध ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. उत्तर भारतावरील ताज्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा (WD) प्रभाव पडण्याची दाट शक्यता असल्यानं महाराष्ट्रात येत्या काही दिवसात हलका ते मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे.विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आणि काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आयएमडीनं विदर्भातील काही जिल्ह्यांन यलो ॲलर्ट केला आहे.

उत्तरेकडील वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम जाणवणार असून येत्या चार दिवसात राज्यात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. 6 ते 9 जानेवारी दरम्यान विविध ठिकाणी पाऊस होणार आहे. यामध्ये 6 जानेवारी : धुळे,नंदुरबार, 7 जानेवारी : धुळे,नंदुरबार,जळगाव,नाशिक,अहमदनगर, 8 जानेवारी : ठाणे पालघर व उत्तर महाराष्ट्र,विदर्भातील काही भाग तर 9 जानेवारी : मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

दरम्यान, बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर जिल्ह्यांना 8 जानेवारीला यलो अलर्ट देण्यात आलाय. तर, 9 जानेवारीला अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आलाय.

शेअर करा
Exit mobile version