मुंबई दि.5 – वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. सर्वप्रथम मुंबई शहरातील पहिली ते आठवीपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर पुणे शहरातील शाळाही बंद करण्यात आल्या होत्या. आता राज्यातील कॉलेजही बंद करण्याचा निर्णय घेण्यात ठेवला आहे.
राज्यातील सर्व विद्यापीठ, महाविद्यालये 15 फेब्रवारी पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उद्य सामतं यांनी दिली आहे. त्यामुळे आता 15 फेब्रुवारीपर्यंत महाविद्यालयांच्या परिक्षा ऑनलाईन घेण्यात येणार असल्याचंही सांगितलं आहे. कृषी विद्यापीठे सोडून इतर सर्व महाविद्यालयांना हा निर्णय लागू होणार आहे. महाविद्यालयांबरोबरचं वसतिगृहदेखील बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परदेशातून व इतर राज्यातून आलेल्या विद्यार्थ्यांसाठीचे वसतिगृह सुरु राहणार आहेत. विद्यार्थी, पालक, प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्यासोबत चर्चा झाली आहे. या चर्चेनतंरचं हा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उद्य सामतं यांनी काल सर्व विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी, कुलगुरू यांच्यासोबत ऑनलाईन बैठक घेतली होती. यावेळी राज्यातील महाविद्यालये बंद करण्याबाबत चर्चा झाली होती. याशिवाय प्रत्येक जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावाही या बैठकीत घेण्यात आला होता.