बीड दि.५ – एएसपी पंकज कुमावत यांच्या चोहोबाजूंनी होणाऱ्या धाडशी कारवाईने गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. बीड येथील मोठ्या कारवाई नंतर आज पुन्हा माजलगाव शहरात मोठी कारवाई केल्याने गुन्हेगार सैरावैरा झाले आहेत.
माहिती अशी की, दिनांक 5/01/2022 रोजी पोलीस अधीक्षक बीड यांना माहिती मिळाली की माजलगाव शहरात वडर वाडा येथे जुनी नगरपालिका समोरील रोडच्या बाजूला गोरख वडर यांचे मोकळ्या जागेतील पत्र्याचे शेडच्या बाजूला मटका मालक शेख इर्शाद इतर काही लोकांना एकत्र बसून स्वतःचे फायद्याकरता कल्याण मटका पैसे लावून जुगाराचा खेळ खेळत आहे. तसेच मोठ्या माधव मांड्यामध्ये पिलाजी शिंदे यांचे घराशेजारी पत्र्याच्या शेडमध्ये तोपिक सय्यद विनापरवाना बेकायदेशीर राजश्री लुटो ऑनलाईन लॉटरी जुगार हा लोकांकडून पैसे घेऊन आकड्यावर लावून ऑनलाईन लॉटरी जुगार खेळवीत आहे.
सदरची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना दिल्याने पंकज कुमावत यांनी पोलीस अधीक्षक बीड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे केज येथील सपोनि संतोष मिसळे व उपविभागीय कार्यालयाचे स्टाफला पाठवून सदर दोन्ही ठिकाणी 03.20 वाजता छापा मारला. सदर ठिकाणी कल्याण मटका खेळताना बारा लोक जागीच मिळून आले. त्यांच्याकडून नगदी व जुगाराचे साहित्य असा एकूण 67060 रू व सामान मिळून आल्याने 12 लोक व मूळ मालक असे एकूण 19 लोकांविरुद्ध माजलगाव येथे बालाजी दराडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर राजश्री ऑनलाइन लॉटरी येते छापा मारला असता सदर ठिकाणी ऑनलाइन जुगार खेळणारा व खेळविणारा इसम जागीच मिळून आले तर एक इसम पळून गेला. त्यांच्याकडून नगदी व ऑनलाईन लॉटरी जुगारासाठी उपयोगात येणारे साहित्य असा एकूण 47300 रुपये चा माल जप्त करून एकूण 4 आरोपी विरुद्ध पोलीस नाईक दिलीप गीते यांची फिर्याद वरून पोलीस ठाणे माजलगाव शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असे एकूण दोन ठिकाणी रेड करून एकूण 114360 हस्तगत करून एकूण 23 आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक बीड, अप्पर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई, सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत केज यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि संतोष मिसळे, पोहेका बालाजी दराडे, पोना राजू वंजारे, दीलीप गिते, शेख पाशा, दीपक जावळे यांनी केली.