Site icon सक्रिय न्यूज

डॉ.जितीन वंजारे यांना ‘आदर्श समाजसेवा पुरस्कार’ प्रदान…..!

डॉ.जितीन वंजारे यांना ‘आदर्श समाजसेवा पुरस्कार’ प्रदान…..!
बीड दि.६ – दर्पण दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई तर्फे दिला जाणारा मनाचा आदर्श समाजसेवा पुरस्कार 2022 सामाजिक कार्यकर्ते डॉ. जितीन वंजारे यांना देण्यात आला.
           सन्मान सोहळा स.मा.गर्गे भवन बीड येथे पार पडला. सोहळ्याचे आयोजक महाराष्ट्र पत्रकार संघांचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी हे होते. तर प्रमुख उपस्थितीत माजी आमदार उषाताई दराडे ,पत्रकार संघांचे महाराष्ट्र अध्यक्ष वसंत मुंढे ,संपादक संतोष माणूरकर, मनीषाताई तोकले, डॉ. गणेश ढवळे, मगदूम भाई यासह सत्कारमुर्ती गुलाब भावसार आणी जेष्ठ पेपर विक्रेते प्रतापराव सासवडे उपस्थित होते.
         एका खेडेगावांत राहून कोरोना महामारित डॉक्टर जितीन वंजारे यांनी त्यांच्या संजीवनी सेवाभावी संस्था संचलित संजीवनी हॉस्पिटल आणि ट्रस्ट तर्फे रुग्णांना मोफत सेवा दिली. कोरोना पॉसिटीव्ह रुग्णांना धीर देऊन त्यांची सुष्ऋता केली, जण जागृती करून स्वच्छता, सुरक्षित अंतर, सामाजिक जबाबदारी, औषधी, कर्तव्य इत्यादी जबाबदाऱ्या पार पडला.तसेच गोर गरीब गरजूना अन्नधान्य किराणा आणी आवश्यक वस्तूचे दान केले. रुग्णांना बेडसाठी प्रयत्न देखील केले. या संपूर्ण कार्याची दखल घेऊन वंजारे यांना आदर्श समाजसेवा पुरस्कार प्रदान केला.
शेअर करा
WhatsappFacebookTwitter
Exit mobile version