बीड दि.7 – राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा विस्फोट सुरू आहे. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यात खबरदारी म्हणून टेस्ट वाढवण्यात येत आहेत. बीड जिल्ह्यात आज जाहीर करण्यात आलेल्या 1776 अहवालात एकूण 16 रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत.
यामध्ये अंबाजोगाई 03, आष्टी 01, बीड 07, गेवराई 01, केज 01, परळी 03 इत्यादी रुग्णाचा समावेश आहे.
दरम्यान जिल्हा प्रशासनाच्या वतीने नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आणि कोरोना नियम पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे.