बीड दि.8 – येथील जिल्हा रुग्णालयाचे माजी जिल्हा शल्य चिकित्सक आणि सध्या नाशिकचे शल्य चिकित्सक असलेले डॉ.अशोक थोरात यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.यावेळी त्यांच्या कुटुंबियांनाही कोरोनाचा संसर्ग झाले असल्याची माहिती आहे.त्यांनी स्वतः या बाबत सोशल मीडियावर माहिती दिली असून कोरोनाला सहज घेऊ नका असे आवाहन त्यांनी केले.
मागील सुमारे दोन वर्षात बीड आणि नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात कोरोना रुग्णांशी दररोज सवांद साधत त्यांची सेवा केली. मात्र या काळात मला कोरोनाची लागण झाली नाही.मात्र मागील आठवड्यात सुट्यात बाहेर फिरायला गेल्यानंतर वापस आल्यावर मला आणि पत्नी,मुलगा आणि मुलीला कोरोना झाला असल्याचे डॉ.थोरात यांनी म्हटले आहे.सध्या आमच्या सर्वांची प्रकृती ठीक असून कोरोनाला कोणीही सहज घेऊ नये असे आवाहन देखील त्यांनी केले आहे