Site icon सक्रिय न्यूज

”या” महिन्याच्या शेवटी कोसळणार कोरोनाचा कळस……!

”या” महिन्याच्या शेवटी कोसळणार कोरोनाचा कळस……!

मुंबई दि.८ – राज्यात पुन्हा एकदा कोरोना विषाणूने (Corona Virus) हाहाकार माजवला आहे. त्यामुळे आता कोरोनाची तिसरी लाटेची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यातच टास्क फोर्सचे सदस्य डॉ. कपिल झिरपे यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत धक्कादायक खुलासा केला आहे.

राज्यात तिसऱ्या लाटेला सुरुवात झाली आहे. जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. तर जानेवारी महिन्याच्या शेवटी कोरोनाची लाट ओसरेल, अशी माहिती झिरपे यांनी दिली आहे. याशिवाय ओमिक्रॉन संसर्गाचा वेग 48 तासात दुप्पट आहे. त्यामुळे राज्याची चिंता वाढली असली तरी घाबरून जाऊ नका, असं आवाहनही झिरपे यांनी केलं आहे. राज्यात शुक्रवारी दिवसभरात 40 हजार 925 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 14 हजार 256 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. राज्यात दिवसभरात 20 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्या विभागाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे राज्य सरकार निर्बंध लावण्याची शक्यता आहे.

दरम्यान, शुक्रवारी प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या मॅरेथॉन बैठका पार पडल्या आहेत. राज्याचे मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांनी आज राज्यातील 6 विभागीय आयुक्तांसोबत बैठक घेतली. या भागात कोरोना परिस्थिती आणि नवीन निर्बंध काय लावता येतील याविषयी चर्चा झाली. चर्चेनंतर मुख्यमंत्र्याकडे याबाबतचा अहवाल सादर करण्यात आला असून मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेणार आहेत.

शेअर करा
Exit mobile version