केज :- युवा राज्य परिषद महाराष्ट्र यांच्या वतीने दिल्य जाणाऱ्या कोव्हिड योद्धा-१९ पुरस्काराने केज येथील पत्रकार गौतम बचुटे आणि रमेश इतापे यांना सन्मानित करण्यात आले आहे.
कोविड १९ आपत्तीमध्ये आपल्या विभागात देशासाठी, समाजासाठी जीवाची पर्वा न करता नागरिकांच्या समस्या, सरकारी नियम व परिपत्रके इतर महत्वाच्या बातम्या जनते पर्यंत पोहचवण्याचे कार्य व सामाजिक कार्याबद्दल राज्य युवा परिषदेच्या वतीने केज येथील पत्रकार गौतम बचुटे व रमेश इतापे यांनी केलेल्या कार्याबद्दल युवा राज्य परिषद महाराष्ट्र यांच्या वतीने दिल्या जाणाऱ्या कोव्हिड योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. युवा शक्ती, देश भक्ती व राष्ट्र सेवा हे राज्य युवा परिषदेचे ब्रीदवाक्य असून निलेशजी थिगळे हे संस्थापक अध्यक्ष आहेत तर प्रवीण प्रधान हे समन्वयक आहेत. त्यांनी पत्रकार गौतम बचुटे व रमेश इतापे यांचे अभिनंदन केले आहे.