Site icon सक्रिय न्यूज

होम आयसोलेशन मध्ये असणाऱ्या रुग्णांसाठी मिळणार एक किट…….!

होम आयसोलेशन मध्ये असणाऱ्या रुग्णांसाठी मिळणार एक किट…….!

मुंबई दि.१० – कोरोना (Corona) महामारीनं जगभरात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या नवनवीन व्हेरियंटनं तर कहरच केला आहे. त्यामुळे सगळीकडे सध्या चिंतेचे वातावरण आहे. कोरोना आणि त्याच्या नवनवीन व्हेरियंटला आटोक्यात आणण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे.

आज कोरोनाच्या पार्श्वभीमीवर झालेल्या बैठकीत राजेश टोपे यांनी होम आयसोलेशन मध्ये असणाऱ्या रुग्णांसाठी महत्त्वाची माहिती दिली आहे. संपूर्ण राज्यातील क्वारंटाईनचा कालावधी हा सारखाच असणार आहे. तो सगळीकडेच सात दिवसांचा राहिल. यामध्ये कुठेही कुणालाही सूट नसणार असल्याचं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. तर होम आयसोलेशन रुग्णांसाठी होम आयसोलेशन हेल्थ कीट देणार आहेत, त्यात सॅनिटायझर, 10 मास्क, माहिती पुस्तिका, 10 पॅरासिटॅमॉल टॅबलेट, 20 मल्टी व्हिटॅमिनच्या टॅबलेट असणार आहेत, असंही राजेश टोपे यांनी सांगितलं.

दरम्यान, सध्या कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यांतील शाळा बंद करण्यात आल्या असून विद्यार्थ्यांची काळजी घेणं गरजेचं आहे.त्यामुळे पालकांनी सरकारला समजून घेऊन सरकारला सहकार्य करावे, असं आवाहनही टोपे यांनी केलं आहे.

शेअर करा
Exit mobile version