Site icon सक्रिय न्यूज

केजमध्ये विनामास्क फिरणाऱ्या विरुद्ध कारवाई…..!

केजमध्ये विनामास्क फिरणाऱ्या विरुद्ध कारवाई…..!
केज दि.११ – येथे महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन आणि नगर पंचायत यांनी कोरोनाच्या ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर विनामास्क फिरणारे पादचारी आणि वाहन चालक यांच्यावर दंडात्मक कार्यवाही केली. या कार्यवाहीत तहसीलदार दुलाजी मेंडके, सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे, नायब तहसीलदार सचिन देशपांडे नगर परिषदेच्या मुख्याधिकारी अशोक साबळे हे स्वतः सहभागी होते.
                    राज्यात दिवसेंदिवस कोरोनाच्या ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असल्याने दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी असल्याने नागरिकांनी खबरदारी घ्यावी म्हणून दि. ११ जानेवारी रोजी केज येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आणि बस स्टँड समोर विनामस्क फिरणारे पादचारी आणि वाहनचालक यांच्यावर दंडात्मक कारवाई केली त्यामुळे विनामास्क फिरणारे धास्तावले आहेत.
शेअर करा
WhatsappFacebookTwitter
Exit mobile version