Site icon सक्रिय न्यूज

करंट देऊन बहिणीस मारतोस का म्हणत दगडाने मारहाण……!

करंट देऊन बहिणीस मारतोस का म्हणत दगडाने मारहाण……!
केज दि.११ – बहिणीस नेहमी भांडण करून करंट देऊन मारणार आहेस का ? असा सवाल उपस्थित करून भावाने बहिणीच्या सासऱ्यास दगडाने मारहाण करून डोके फोडल्याची घटना केज शहरात घडली. याप्रकरणी केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
      केज तालुक्यातील साळेगाव येथील अर्जुन रामराव काळे हे बाळापूर ( ता. जि. बीड ) येथे वास्तव्यास असून १० जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास केज शहरातील बसस्थानकासमोर आले होते. त्यांच्या सुनेचा भाऊ विजय राजेंद्र काळे ( रा. क्रांती नगर, केज ) याने तुझा मुलगा माझे बहिणीशी नेहमी भांडण का करतो, तू माझ्या बहिणीस करंट देऊन मारणार आहेस का ? असे म्हणत अर्जुन काळे यास शिवीगाळ करीत लाथाबुक्याने मारहाण करून डोक्यात दगड मारून डोके फोडले. जीवे मारण्याची धमकी ही दिली. अशी फिर्याद अर्जुन काळे यांनी दिल्यावरून विजय काळे याच्याविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलीस नाईक मंगेश भोले हे पुढील तपास करत आहेत.
शेअर करा
WhatsappFacebookTwitter
Exit mobile version