केज दि.१२ – जिल्ह्यात १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण युद्ध पातळीवर सुरू आहे. शाळा महाविद्यालयात जाऊन आरोग्य विभागाच्या वतीने लसीकरण करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने तालुक्यातील सारणी (आ) येथील पुरुषोत्तमदादा सोनवणे विद्यालयातही लसीकरण मोहीम राबविण्यात आली.
मंगळवारी (दि.१२) रोजी सकाळी १० वाजता युसुफ वडगाव आरोग्य केंद्राच्या वतीने तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विकास आठवले, वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्रोही ब्राह्मणे – भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली पुरुषोत्तमदादा सोनवणे विद्यालयात लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समुदाय वैद्यकीय अधिकारी डॉ.कृष्णा सुर्यवंशी यांच्यासह आरोग्य कर्मचारी श्रीमती आर.आर.मस्के , मोराळे यांनी सुमारे ३२१ विद्यार्थ्यांचे लसीकरण केले.
यावेळी प्राचार्य पी.एच.लोमटे यांच्यासह सर्व शिक्षक वृंदानी विद्यार्थ्यांना लसीकरण करून घेण्यास प्रोत्साहित केले.