Site icon सक्रिय न्यूज

कोरोना नियम पायदळी, कोचिंग क्लासेसला 95 हजारांचा दंड……!

कोरोना नियम पायदळी, कोचिंग क्लासेसला 95 हजारांचा दंड……!

बीड दि.१४ – कोरोना नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रकरणी नांदेडमध्ये चार कोचिंग क्लासेसला तब्बल 95 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.महापालिकेच्या पथकाने ही कारवाई गुरुवारी केली.

                       नांदेड शहरात कोरोणाचा बुधवारी उद्रेक झाला होता. एकाच दिवशी 474 रुग्ण आढळले. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा हादरून गेली. कोरोनाची तिसरी लाट वेगाने पसरेल असा अंदाज वैद्यकीय तज्ञांनी वर्तवला आहे. नांदेडमध्ये बुधवारी एकाच दिवशी 474 रुग्ण आढळले आहेत. महापालिकेने 12 जानेवारीपासून शहरात कोरोना नियमावलीच्या अंमलबजावणीसाठी तेरा पथके कार्यान्वित केले आहेत. या पथकाने गुरुवारी शहरातील कोचिंग क्लासेसला भेटी दिल्या. यावेळी कोचिंग क्लासेस मध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी आढळले. अनेक विद्यार्थ्यांना मास्कही नव्हता. त्यामुळे महापालिकेच्या या पथकाने कोचिंग क्लासेसच्या संचालकांना दंड ठोठावला आहे.
           दरम्यान, यामध्ये सर्वाधिक दंड आरसीसी क्लासेस ला ठोठावला आहे. पन्नास हजार रुपये दंड आकारणी करण्यात आली आहे. शांभवी क्लासेस ला 25 हजार, दरक कोचिंग क्लासेसला १० हजार रुपये आणि सलगरे कोचिंग क्लासेसला दहा हजार रुपये दंड ठोठावला आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख उपायुक्त अजितपालसिंघ संधू यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली आहे यापुढेही शहरात अशीच कारवाई सुरू राहील असे उपायुक्त संधु यांनी सांगितले.
शेअर करा
Exit mobile version