Site icon सक्रिय न्यूज

केज तालुक्यात अल्पवयीन मुलाची आत्महत्या, अपशब्द जिव्हारी लागल्याने उचलले टोकाचे पाऊल……!

केज तालुक्यात अल्पवयीन मुलाची आत्महत्या, अपशब्द जिव्हारी लागल्याने उचलले टोकाचे पाऊल……!
केज दि.14 – उसने पैसे देण्यास नकार दिल्याने दोघांनी अल्पवयीन मुलास मारहाण केली. यावेळी वापरलेले अपशब्द जिव्हारी लागल्याने दुखावलेल्या त्या मुलाने बाथरूममध्ये जाऊन शर्टाने गळफास घेतल्याची घटना तालुक्यातील बनकारंजा येथे घडली.
             विक्रम वसंत लांब (वय 17, रा. बनकरंजा, ता. केज) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे आहे. विक्रमच्या वडिलांचे कुंबेफळ शिवारात हॉटेल आहे. रविवारी (दि. 9 ) सायंकाळी 5 वाजता त्याचे वडील पाणबुडी मोटार टाकण्यासाठी शेतात गेले होते.त्यामुळे विक्रम हॉटेल सांभाळत होता. यावेळी गावातील बळीराम नानासाहेब लांब व सुभाष नवनाव लांब हे दोघे हॉटेलवर आले. त्यांनी विक्रमकडे दोन हजार रुपये उसने देण्याची मागणी केली. परंतु, जवळ पैसे नसल्याने विक्रमने त्यांना नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या त्या दोघांनी विक्रमजवळ कुटुंबातील व्यक्तीबद्दल अपशब्द वापरले आणि आणि त्याला चापटाबुक्याने मारहाण केली. वडील शेतातून आल्यानंतर विक्रमने रडत रडत त्यांना घडलेली घटना सांगितली. वडिलांनी त्याला समजावून शांत करण्याचा प्रयत्न केला, परंतु अपशब्द जिहारी लागल्याने विक्रम शांत होत नव्हता. त्यानंतर घरी असताना 9 वाजता विक्रमने बाथरूममध्ये जाऊन खिडकीला अंगावरील शर्टाच्या साह्याने गळफास घेतला.
                दरम्यान, हे लक्षात आल्यानंतर विक्रमला रुग्णालयात दाखल केले असता तिथे डॉक्टरांनी तपासून त्यास मयत घोषित केले. याप्रकरणी वसंत लांब यांच्या फिर्यादीवरून दोन्ही आरोपींवर युसुफवडगाव ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
शेअर करा
Exit mobile version