Site icon सक्रिय न्यूज

ऊसतोड मजुरांच्या भेटीला सुमंत धस थेट कर्नाटकात……!

ऊसतोड मजुरांच्या भेटीला सुमंत धस थेट कर्नाटकात……!
बीड दि.१४ –  जिल्ह्यातून ऊसतोडणी साठी पश्चिम महाराष्ट्र व कर्नाटकात लाखो ऊसतोड मजूर गेले आहेत.पश्चिम महाराष्ट्र व कर्नाटकात जाऊन ऊसतोडणी साठी गेलेल्या ऊसतोड मजूर व महिलांची भेट घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी मनसे चे बीड जिल्हा अध्यक्ष सुमंत धस व केज तालुका अध्यक्ष कल्याण केदार गेले आहेत.
              संक्रात्ती निम्मित ऊसतोड महिलांना मनसेच्या वतीने साड्यांचे वाटप देखील करण्यात आले आहे.कर्नाटकातील नंदी निपानी,शिवशक्ती,कागवाड, जमखंडी आदी साखर कारखान्यावर असलेल्या केज तालुक्यातील सांगवी,सारणी,सारूळ, माळेवाडी,नाहोली, एकुरका,दरडवाडी आगेवाडी, मुंडेवाडी,शिरूरघाट,नांदुर घाट आदी गावातील ऊसतोड महिलांना संक्रात्ती निम्मित साड्यांचे वाटप केले.
                    या उपक्रमात मनसे चे बीड जिल्हा अध्यक्ष सुमंत धस,मनसे चे केज तालुका अध्यक्ष कल्याण केदार,माळेवाडी चे शाखा अध्यक्ष गोविंद हाके,मनसे चे सांगवी शाखा संघटक सुभाष केदार आदी सहभागी होते.
————————————————

ऊसतोड मजुरांच्या संघर्षाला सलाम – सुमंत धस

 गावा पासून हजारो किमोमीटर लांब जाऊन ऊसतोड मजूर थंडी,ऊन,वारा,पाऊस याचा सामना करत ऊसतोडणी करून आपला उदरनिर्वाह करत आहेत.जिल्ह्यात रोजगार उपलब्ध असेल तर एवढ्या लांब येऊन संघर्ष करण्याची वेळ ऊसतोड मजुरांवर येणार नाही,अनेक संकटांचा सामना करत ऊसतोड मजूर काम करतात त्यांच्या या संघर्षाला सलाम…..!

शेअर करा
Exit mobile version