नांदेड दि.१० – व्हेंटिलेटरवर असलेल्या इतवारा हनुमान चौक भागातील ६५ वर्षीय कोरोना बाधित वृद्ध व्यक्तीचा आज बुधवार दि.१० जुन रोजी सकाळी ८.१५ वाजता डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालयात मृत्यू झाला आहे. गेल्या ६ जून रोजी या वृध्द व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्याची प्रकृती गंभीर होती. उपचाराला प्रतिसाद दिला नसल्याने त्याचा मृत्यू झाला…
आतापर्यंत जिल्ह्याची स्थिती…..
बाधित व्यक्तींची एकूण संख्या: १९५
मृत्यू: १०
डिस्चार्ज: १३४
उपचार सुरू: ५१