परभणी दि.१७ – महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्यस्तरीय कार्यकारिणी सह सन २०२२ चे सर्व छत्तीस जिल्हाध्यक्ष राज्यध्यक्ष विलास कोळेकर यांनी आज जाहीर केले. त्यात परभणी जिल्हाध्यक्ष पदी जिंतूर चे पत्रकार प्रदिप कोकडवार यांची निवड केली आहे.
मागच्या अनेक वर्षांपासून पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात कोकडवार यांच्या कार्याची दखल घेऊन सदरील निवड करण्यात आल्याबद्दल राज्य कमिटीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.