Site icon सक्रिय न्यूज

केजमध्ये दोन दुकानं फोडले……!

केजमध्ये दोन दुकानं फोडले……!
 केज दि.१७ – अज्ञात चोरट्यांनी सिमेंट व किराणा दुकानाचे शटर तोडून दुकानातील नगदी ४३ हजार रुपायांसह सिगारेट, मसाले पॉकेट लंपास केल्याची घटना केज शहरात घडली. याप्रकरणी केज पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.
      केज तालुक्यातील टाकळी येथील परमेश्वर वैजनाथ घुले यांचे केज – बीड रस्त्यावर किराणा दुकान आहे. तर शहरातील सुरेंद्र बाळासाहेब पत्की यांचे सिमेंटचे दुकान आहे. १५ जानेवारी रोजी रात्री दुकाने बंद करून हे दुकानदार आपल्या घरी गेले. १६ जानेवारी रोजी सकाळी ७.३० वाजेच्या पूर्वी अज्ञात चोरट्यांनी दोन्ही दुकानाचे शटर तोडून आतमध्ये प्रवेश करीत घुले यांचे दुकानाच्या गल्ल्यातील नगदी १८ हजार रुपये, सिगारेट व मसाले पॉकेट असा १९ हजार १५० रुपयांचा ऐवज तर पत्की यांच्या सिमेंट दुकानातील नगदी २५ हजार रुपयांची रक्कम घेऊन चोरटे पसार झाले.
           दरम्यान १६ रोजी रात्री उशिरा परमेश्वर घुले यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस नाईक रामदास तांदळे करत आहेत.
शेअर करा
Exit mobile version