Site icon सक्रिय न्यूज

होळजवळ पिकअपची कारला धडक…….!

होळजवळ पिकअपची कारला धडक…….!
केज दि.१७ – भरधाव वेगाने आलेल्या पिकअपने कारला समोरून जोराची धडक दिल्याने या अपघातात कारमधील पती – पत्नी दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना केज – अंबाजोगाई रस्त्यावरील होळ शिवारात घडली. जखमींवर लातूरच्या रुग्णालयात उपचार सुरू असून पिकअप चालकाविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
         परळी ( वैजनाथ ) येथील सोमेश्वर गंगाधर मुंडे व त्यांची पत्नी वर्षा सोमेश्वर मुंडे हे दोघे ८ जानेवारी रोजी रात्री ८ ते ८.३० वाजेच्या सुमारास कारने ( एम. एच. ४४ एस ५१७५ ) परळीकडून केजकडे येत होते. त्यांची कार केज – अंबाजोगाई रस्त्यावरील होळ शिवारात आली असता केजकडून अंबाजोगाईकडे भरधाव वेगाने निघालेल्या पिकअपच्या ( एम. एच. ०४ ई वाय ६०४९ ) चालकाच्या निष्काळजीपणामुळे पिकअपने त्यांच्या कारला जोराची धडक दिली. या झालेल्या अपघातात कारमधील सोमेश्वर मुंडे व त्यांची पत्नी वर्षा मुंडे हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर लातूरच्या रुग्णालयात उपचार सुरू असून १७ जानेवारी रोजी सोमेश्वर मुंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पिकअप चालकाविरद्ध युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पिकअप चालक फरार असून पुढील तपास सहाय्यक फौजदार विलास तुपारे  करत आहेत.
शेअर करा
Exit mobile version