बीड दि.१९ – मागच्या एक महिन्यापासून उत्सुकता लागलेल्या जिल्ह्यातील पाच नगरपंचयात चे निकाल घोषित झाले असून आष्टी, शिरूर आणि पाटोदा भाजप, वडवणी राष्ट्रवादी तर केज नगरपंचयात मध्ये स्थानिक जनविकास आघाडीचे जास्त उमेदवार निवडून आले आहेत.
ओबीसी आरक्षणामुळे जिल्ह्यातील पाच नगरपंचयात ओबीसी वार्ड वगळता इतर जागांसाठी दि.२१ डिसेंबर ला मतदान झाले होते. तर पाच नगरपंचयात मधील उर्वरित २० जागांसाठी १८ जानेवारीला मतदान होऊन आज दि.१९ रोजी सर्वच जागांचे निकाल जाहीर झाले.यामध्ये आष्टी, शिरूर आणि पाटोदा या तीन नगरपंचयात मध्ये भाजपचे, वडवणीमध्ये राष्ट्रवादी चे तर केज नगरपंचयात मध्ये स्थानिक जनविकास आघाडीचे वर्चस्व दिसून आले.
दरम्यान केजमध्ये धक्कादायक निकाल लागले असून प्रचारादरम्यान जे वातावरण होते त्याच्या पूर्णपणे वेगळे निकाल आलेले दिसून येत आहेत.