Site icon सक्रिय न्यूज

महिलेचा विहिरीत बुडून मृत्यू…….! 

महिलेचा विहिरीत बुडून मृत्यू…….! 
केज दि.२० – विहिरीत बुडुन एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची सांगवी सारणी येथील घटना ताजी असतानाच शेतात फेरफटका मारण्यासाठी गेलेल्या ८५ वर्षीय महिलेचा विहिरीत पाय घसरून पडल्याने पाण्यात बुडुन मृत्यू झाल्याची घटना धारूर तालुक्यातील गांजपुर येथे गुरुवारी दुपारी उघडकीस आली.
     गांजपुर येथील मधुरा दत्ता चोले ( वय ८५ ) ह्या ४० वर्षाहून अधिक काळापासून माहेरी राहत होत्या. त्या गुरुवारी सकाळी ११ वाजता शेतात फेरफटका मारण्यासाठी गेल्या होत्या. त्यांच्या शेतातील विहिरीजवळून जात असताना त्यांचा पाय घसरल्याने त्या विहिरीत पडल्या. विहिरीत भरपूर पाणी असल्याने पाण्यात बुडून मधुरा चोले यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच युसुफवडगाव ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दहिफळे यांच्या आदेशावरून पोलीस नाईक बालासाहेब घोरपडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. सविता ज्ञानेश्वर डापकर यांच्या खबरेवरून युसुफवडगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस नाईक संपत शेंडगे हे पुढील तपास करत आहेत.
शेअर करा
Exit mobile version