केज दि.२५ – शहरातील विवेकानंद शाळेतील विद्यार्थीप्रिय शिक्षक उल्हास गोविंद जोशी यांचे दिर्घ आजाराने निधन झाले असून मृत्यूसमयी त्यांचे वय 57 वर्षे होते.
शहरातील विवेकानंद शाळेतील माध्यमिक विभागात गणित विषयाचे अध्यापन करणारे उल्हास जोशी हे मागच्या कांही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर पुणे येथे एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारा दरम्यान मंगळवारी (दि.२५ जानेवारी) 7.30 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. अतिशय शिस्तप्रिय आणि सर्वांशी मैत्रीपूर्ण नाते असलेले जोशी सर विद्यार्थीप्रिय होते.
त्यांच्या निधनामुळे शैक्षणिक क्षेत्रासह मित्रपरिवारात हळहळ व्यक्त होत आहे.