केज दि.२६ – केज नगरपंचयात निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेस व जनविकास आघाडी स्वतंत्र निवडणूक लढले. परंतु कोणत्याच पक्षाला बहुमत मिळाले नसल्याने कोण सत्ता स्थापणार असा संभ्रम निर्माण झाला होता. परंतु खासदार रजनी ताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आणि जनविकास आघाडी केजच्या विकासासाठी एकत्र आली असून नगरपंचयात मध्ये सत्ता स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे आदित्य पाटील व जनविकास आघाडीचे हारून इनामदार यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन घोषित केले.
केज नगरपंचयात निवडणुकीत जनविकास आघाडी 8, राष्ट्रवादी 5, काँग्रेस 3 तर एक अपक्ष असे उमेदवार निवडून आले होते. परंतु यामध्ये कुणालाच स्पष्ट बहुमत नसल्याने सत्तेचा पेच निर्माण झाला होता. परंतु यावर आता पडदा पडला असून केजच्या विकासासाठी खासदार रजनी ताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली जनविकास आघाडी व काँग्रेस एकत्र आले असून सत्ता स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती आदित्य पाटील आणि हारून इनामदार यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे माजीमंत्री पंकजा मुंडे यांनी नगराध्यक्ष भाजपचाच होणार या वक्तव्याला पूर्णविराम मिळाला आहे.
यावेळी अंकुशराव इंगळे, पशुपतीनाथ दांगट, विजयकुमार भन्साळी, दिलीप गुळभिले, शकील इनामदार, हाजीमौला सौदागर यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.