Site icon सक्रिय न्यूज

केज नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर, महिलेला मिळणार प्रथम नागरिक होण्याची संधी…..!

केज नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर, महिलेला मिळणार प्रथम नागरिक होण्याची संधी…..!
केज दि.२७ – 17 जागा असलेल्या केज नगरपंचयातीसाठी नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर झाले असून एस्सी प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झाले असून केजच्या प्रथम नागरिक होण्याचा बहुमान महिलेला मिळणार आहे.
           केज नगरपंचयात निवडणुकीत कुठल्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. परंतु जनविकास परिवर्तन आघाडी आणि कॉंग्रेस एकत्र आल्याने कुणाची सत्ता येणार हे स्पष्ट झाले आहे. जनविकास आघाडीचा नगराध्यक्ष तर काँग्रेस कडे उपनगराध्यक्ष पद राहणार आहे. परंतु नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर नसल्याने कोण नगराध्यक्ष होणार याकडे केजवासीयांचे लक्ष लागले होते. परंतु आज मंत्रालयात आरक्षण सोडत झाली असून यामध्ये केजचे नगराध्यक्ष पद एसस्सी प्रवर्गासाठी जाहीर झाले आहे. परंतु जनविकास आणि काँग्रेस कडे एस्सी प्रवर्गातून पुरुष उमेदवार नसल्याने व केवळ त्या प्रवर्गातून केवळ दोन महिलाच निवडून आल्याने महिलेच्या गळ्यात नगराध्यक्ष पदाची माळ पडणार आहे.
           दरम्यान जनविकास आघाडीमध्ये  एस्सी प्रवर्गातून सीता बनसोड व पद्मिन शिंदे ह्या दोन महिला निवडून आल्याने दोघींपैकी कुणाला नगराध्यक्ष पदाची संधी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर पल्लवी ओमप्रकाश रांजणकर ह्या सुद्धा एस्सी प्रवर्गातून अपक्ष म्हणून निवडून आल्या असून त्यांना संधी मिळेल का ? अशीही चर्चा सुरू आहे.
शेअर करा
Exit mobile version